मौजे ग्रामपंचायत नांदगाव तालुका भोर जिल्हा पुणे येथील समता नगर येथे महामानव तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर महापुरुषांची संयुक्तिक जयंती महोत्सव साजरा

May 11, 2026 - 10:33
May 11, 2026 - 10:38
 0
मौजे ग्रामपंचायत नांदगाव तालुका भोर जिल्हा पुणे येथील समता नगर येथे महामानव तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर महापुरुषांची संयुक्तिक  जयंती महोत्सव साजरा

मौजे ग्रामपंचायत नांदगाव तालुका भोर जिल्हा पुणे येथील समता नगर येथे महामानव तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर महापुरुषांची संयुक्तिक जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी धम्मदीप बुद्ध विहार संघ नांदगाव आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये सकाळी वंदना सूतपठण ,भव्य महापुरुषांची मिरवणूक, संध्याकाळी जाहीर सभा, रात्री अन्नदान भोजन कार्यक्रम ,लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भीम गीतांचा गायनाचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम, करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. यावेळी मौजे ग्रामपंचायत नांदगाव चे विद्यमान सरपंच भाग्यश्री गणेश चराटे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सरपंचांनी विकास कामाबद्दल गेलेले आश्वासन पूर्ण केले असे गावकऱ्यांचे म्हणणे होते विविध विकास कामावरती गावामध्ये विकासाची नांदी सरपंचाच्या कारभारामुळे आली असं गावकऱ्यांनी सांगितले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाला अनेक नेत्यांनी हजेरी लावली यावेळी विद्यमान सरपंच भाग्यश्री गणेश चऱ्हाटे ,ज्ञानोबा बाजीराव भोसले उपसरपंच ,संतोष रघुनाथ कुडले तंटामुक्ती अध्यक्ष नांदगाव, रेखा रवींद्र जगताप ग्रामपंचायत सदस्य ,बापू कुडले प्रहार अपंग क्रांतीचे अध्यक्ष, नीलम जगताप महिला अध्यक्ष भीम आर्मी भोर तालुका व
 विद्याधर कांबळे वरिष्ठ लिपिक पीडब्ल्यूडी, अविनाशजी गायकवाड अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग भोर तालुका , प्रमोद भालेराव वंचित बहुजन आघाडी, डॉ,राजेश दीवार, रामभाऊ रणखांबे भारतीय बौद्ध महासभा मा. अध्यक्ष भोर ता,बबन भाऊसाहेब कुडले ज्येष्ठ मार्गदर्शक,  भरत कुडले मा. ग्रामपंचायत सदस्य नांदगाव ,निलेश सावंत पोलीस पाटील तसेच धम्मदीप बौद्ध विहार संघ नांदगाव संघाचे अध्यक्ष विकासजी यादव , सुभानंद यादव खजिनदार, अनिल जगताप उपाध्यक्ष, प्रशांत जगताप उप खजिनदार, संजय यादव सल्लागार ,  शंकर यादव बोद्दाचार्य, विनोद यादव सदस्य, विकास यादव सदस्य,भरत यादव सदस्य , जगन यादव सल्लागार , संदीप जगताप मुंबई कमिटी खजिनदार,रवी जगताप, योगेश साळुंखे सेक्रेटरी,  गुलाब जगताप सदस्य , दिलीप श्रीपती जगताप सदस्य, अमोल जगताप सदस्य ,अनिल धर्मा जगताप सदस्य , सुनील जगताप सदस्य, जेष्ठ नागरिक अशोक यादव, दशरथ साळुंखे, सर्जेराव जगताप, राहुल जगताप , दिलीप जगताप, धर्मा जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow