माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण
शासन निर्णय क्रमांक शालेय शिक्षण क्रमांकएफईडी/1095/54782/(1789/95) साशि-5,दिनांक 11 ऑगस्ट 1995 अन्वये 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अनुदानित अशासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शाळा व अध्यापक विदयालयातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे पाल्यांना सर्व स्तरावर मोफत शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.या योजनेखाली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यात येते.इयत्ता 10 वी पर्यंत सर्वाना नि:शुल्क शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित असल्याने या योजनंाचा लाभ उच्च माध्यमिक स्तर व तत्सम अभ्यासक्रमाखालील इतर लाभार्थी तसेच पदवी/पदव्युत्तर स्तरावरील उच्च शिक्षण घेणारे विदयार्थी/विदयार्थ्यांनींना देण्यात येतो.व्यावसायिक अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विनाअनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांने प्राणित दाराने फी ची प्रतिपूर्ती करण्यात येते या सवलती समाधानकारक प्रगती,चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहीत अभ्यासक्रम संपेपर्यंत चालू राहतात.
What's Your Reaction?