इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण
शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 1987 अन्वये इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण सर्वच मुलींना मोफत केलेले आहे.या योजनेचा समावेश इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण या योजनेत सन 199-19997 पासून झाल्यांने सदयस्थितीत इयत्ता 11 वी 12 वी या दोन इयत्तांमधील मुलीचा समावेश या योजनेत होतो.शैक्षणिक वर्षात किमान आवश्यक उपस्थिती आणि समाधानकारक प्रगती या अटींवर पुढील शैक्षणिक वर्षी ही सवलत चालू राहते.एखादी विदयार्थिनी शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यांस आणि तिने त्याच वर्षात पुन्हा प्रवेश घेतल्यांस विदयार्थिनीला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.अनुदानित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविदयालये यांच्या वेतनांवर 100 टक्के अनुदान शासनाकडून दिले जात असल्यांने या योजनेखाली अनुदानित कनिष्ठ महाविदयालयांना फक्त सत्र शुल्क/प्रवेश शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यांत येते.आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविदयालयाच्या बाबतीत शैक्षणिक शुल्क,सत्र शुल्क,प्रवेश शुल्क यांची प्रमाणित दरांने प्रतिपूर्ती करण्यात येते.या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची अट नाही.त्यामुळे सर्व आर्थिक स्तरावरील विदयार्थिनी आपोआपच या योजनेला पात्र ठरतात.कुटुंबातील पहिल्या 3 अपत्यांपर्यंत या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे.
What's Your Reaction?