पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंचांची आढावा बैठक यशस्वीरीत्या पार
पुणे जिल्हा अध्यक्ष मा. विकास कडूपाटील यांच्या अध्यक्षतेखाली नितू मंडके सभागृह, स्वारगेट येथे पुणे जिल्ह्यातील सर्व सरपंचांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायतीचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी, विकास कामांची गती, निधीची अडचण आणि शासनाकडे असलेल्या मागण्या यावर सविस्तर चर्चा झाली. या मागण्यांचा लेखी अहवाल शासन दरबारी सादर करून लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाध्यक्ष कडूपाटील यांनी सांगितले. बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला की, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरपंचांची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल, जेणेकरून स्थानिक प्रशासन अधिक परिणामकारकपणे कार्य करू शकेल.
सदर बैठकीस श्री. विकास कडूपाटील,सौ. विभा दीप मांढरे,कु. छाया मुकुंद सपकाळ,सौ. आरती किरण धावले,सौ. मंगल माधवी कंक,सौ. सिवता खाटपे,सौ. माधवी किरण सोनावणे,सौ. रेखा साळेकर,श्री. हनुमंत ढेबे,सौ. सिवता गायकवाड,श्री. अमोल लिमन,श्री. संतोष गोळे,श्री. पंढरीनाथ खोपडे,सौ. सुवर्णा संजय निगडे,सौ. भागीरथी चव्हाटे,श्री. विनय धुमाळ,सौ. भागीरथी सचिन पवार,सौ. पल्लवी जाधव,सौ. विजाताई पांगारे,सौ. शिशुकला नवघणे,सौ. तानूबाई गोदावले,श्री. सखाराम राठवले,श्री. अनंता बिरामणे,सौ. सीता खुले,सौ. सुनीता नळावडे,सौ. सारिका कोडितकर,श्री. सुनील पासलकर,श्री. जयकिशन जाधव,श्री. गणेश बांगर,सौ. तृप्ती विवरकर,सौ. पल्लवी भोसले,श्री. भाऊसो उंबरे,श्री. जगनाथ वाढणे,सौ. पूजा गायकवाड,श्री. सुनील चौधरी,सौ. शीतल जगताप,श्री. बजरंग सुदाम म्हसके ,श्री. शांताराम बाठे,श्री. सोमनाथ भाकरे,सौ. मीनाक्षी जाधव,श्री. रोहन जगताप,श्री. विजय जंगले,सौ. रवेमा ,श्री. रघुनाथ झांजरे,श्री. महादेव भावरी ,श्री. जयराम जोशी,श्री. चंद्रकांत बांबळे,श्री. सखाराम गमले,श्री. सूर्यभान संपादक,सौ. संतोषी दारवटकर,सौ. कल्पना जाधव ,सौ. सुजाता ढमाले,सौ. सुरेखा तोंडे उपस्थित होते
What's Your Reaction?