राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
मुलींच्या शिक्षणाला चालनादेण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याकरीता व मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करुन घेण्याच्या दृष्टीने माध्यमिक शाळेत शिक्षण घेणा-या दारीद्रय रेषेखालील इयत्ता आठवीच्या मुलींनसाठी ही योजना सुरु करण्यास शासन निर्णय क्रमांक संकिर्ण 2008/33892 (181/08)/माशि-3.दि.18 फेब्रुवारी 2009 अन्वये मान्यता देणेत आलेली आहे.ग्रामीण भाग व क केंद्र वर्ग नगर परिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी योजना लागू आहेत.तसेच इयत्ता 7 वी मध्ये 45% गुण प्राप्त करणे आवश्यक तसेच लाभार्थी ही शासन मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असावी.लाभार्थ्याची निवड दुर्गम/अतिदुर्गम ग्रामिण भाग तसेच शरीभागातील झोपड पट्टी/गलीच्छ वस्तीतील मुली यानुसार प्राध्यान्याने केली जाते.
What's Your Reaction?