मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत नांदगाव ग्रामपंचायतीकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन
नांदगाव (प्रतिनिधी) — मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत मौजे नांदगाव ग्रामपंचायत तर्फे गावठाण, पाटीलवाडा, चऱ्हाटवाडी व समतानगर वस्ती येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. "प्लास्टिक मुक्त गाव – स्वच्छ गाव – सुंदर गाव" या संकल्पनेखाली गाव स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी एकत्रित सहभाग नोंदवला.
या मोहिमेत सरपंच सौ. भाग्यश्री गणेश चऱ्हाटे, उपसरपंच ज्ञानोबा भोसले, सदस्य कमल अंकुश कुडले, मुक्ता शंकर कुडले, योगेश बाबुराव कुडले, रेखा रवींद्र जगताप, वंदना विठ्ठल चऱ्हाटे, रमेश चऱ्हाटे, तसेच ग्रामसेवक उज्वला सपाटे आणि शिपाई देविदास अजगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील माता-भगिनी, लहान मुले आणि सर्व ग्रामस्थ यांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ग्रामस्थांनी सांगितले की, “आपले गाव स्वच्छ, सुंदर व मूलभूत सोयींनी सुसज्ज असावे, यासाठी ग्रामपंचायत सातत्याने कार्यरत आहे.”
अभियानाच्या यशस्वी आयोजनामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने असे मत व्यक्त केले की, “आपलं नांदगाव हे आदर्श गाव म्हणून ओळखले जावे आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे गाव बनावे,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?