मौजे ग्रामपंचायत नांदगाव – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदगाव | प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 च्या पहिल्या दिवशी मौजे ग्रामपंचायत नांदगाव येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत जनजागृती मोहीम राबवून सार्वजनिक स्वच्छता, कचरा मुक्त गाव, प्लास्टिक मुक्त गाव, स्वच्छ व सुंदर गाव या संकल्पनांवर भर देण्यात आला.
ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांना माहिती देण्यात आली व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात ग्रामस्थांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, शिक्षक, आशा सेविका, शिपाई, जेष्ठ नागरिक, महिला मंडळ, चेअरमन, आजी-माजी पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
समस्त ग्रामस्थ मंडळ नांदगाव यांनी या अभियानाला सक्रीय पाठिंबा देत ग्रामविकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.
What's Your Reaction?