इयत्ता १२ वी पर्यंत मुलांना मोफत शिक्षण

Feb 15, 2025 - 13:19
Feb 15, 2025 - 13:49
 0
इयत्ता १२ वी पर्यंत मुलांना मोफत शिक्षण

शालेय शिक्षण विभाग,शासन निर्णय क्रमांक एफईडी-1096/प.्रक्र./1978/96/साशि-5,दिनांक 13 जून 1996 अन्वये 1996-1997 पासून शासन अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील इययत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व विदयार्थ्यांना प्रमाणित शुल्क दरांने मोफत शिक्षण योजना लागू करण्यांत आलेली आहे.किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असणा-या पालकांच्या पाल्यांना ही सवलत मिळू शकते.या सवलतीसाठी 75 टक्के उपस्थिती व चांगली वर्तणूक असणे आवश्यक असून अनुत्तीर्ण होणा-या विदयार्थ्यांची सवलत त्या वर्षापुरती रोखण्यांत येईल.मात्र तो उत्तीर्ण होताच ही सवलत पुढील शैक्षणिक वर्षात पूर्ववत चालू रहाते. .अनुदानित माध्यमिक शाळांच्या वेतनांवर 100 टक्के अनुदान शासनाकडून दिले जात असल्यांने या योजनेखाली अनुदानित शाळांना फक्त सत्र शुल्क/प्रवेश शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यांत येते. आणि विनाअनुदानित शाळांच्या बाबतीत शैक्षणिक शुल्क,सत्र शुल्क,प्रवेश शुल्क यांची प्रमाणित दरांने प्रतिपूर्ती करण्यात येते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow