पूर्वमाध्यमिक / माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
गुणवान विदयार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विदयार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना कार्यरत आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेकडून घेणेत आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार शिष्यवृत्त्या मंजूर केल्या जातात. जिल्हास्तरावरील परीक्षाचे संनियंत्रण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांचेकडून केले जाते. पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती विदयार्थ्यांची समाधानकारक प्रगती व चांगल्या वर्तणुकीच्या आधारे पुढे चालू राहते. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एससीएच-2009/(90/09/) केंपुयो,दिनांक 22 जुलै 2010 अन्वये सन 2009.2010 या शैक्षणिक वर्षापासून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचे इयत्ता 5 वी ते 7 वी सुधारित दर रुपये 100/- दरमहा व माध्यमिक शिष्यवृत्तीचे इयत्ता 8 वी ते 10 वी सुधारित दर रुपये 150/- दरमहा करण्यांत आलेले आहेत.प्रत्येक टप्प्यात शिष्यवृत्तीचा कालावधी 3 वर्षाचा आहे.ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात 10 महिन्यंासाठी दिली जाते.सन 2010.2011 पासून शिष्यवृत्ती पात्र विदयार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यांत येते.
What's Your Reaction?