आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्टया मागासवर्गातील हुशार मुले/मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.अशांना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हण्ून सदरची योजना कार्यान्वित करण्यांत आलेली आहे.ही शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविदयालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे.सदर शिष्यवृत्ती साठी पात्र विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 30000/- या मर्यादेत असावे.वसतीगृहात राहणा-या मुलांकरिता शिष्यवृत्ती दर दरमहा रुपये 140/- व मुलींकरिता दरमहा रुपये 160/- आहे.तसेच वसतीगृहात न राहणा-या मुलांना रुपये 80/- व मुलींना रुपये 100/- आहेत.ही शिष्यवृत्ती 10 महिन्यांकरिता दिली जाते.इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना ही शिष्यवृत्ती इयत्ता 12 वी पर्यंत पुढे चालू राहते.
What's Your Reaction?