राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना
सदर योजना केंद्र पुरस्कृत असून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली (एन.सी.ई.आर.टी.) यांने सन 2007-2008 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता 8 वी पासून सुरु केली आहे.महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर सर्वसाधारण नोंव्हेंबर महिन्यामध्ये घेणेत येते.महाराष्ट्रासाठी जिल्हानिहाय विद्यार्थी संखेनुसार दरवर्षी केंद्रशासनाकडून राज्यासाठी निश्चित केलेल्या कोटयानुसार वार्षिक रुपये 6000/- शिष्यवृत्ती दिली जाते.ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला इयत्ता 9 वी ते 12 पर्यंत दिली जाते. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न (आई व वडील दोघांचे मिळून) रुपये 1,50,000/- पेक्षा कमी आहे. व ज्या विद्यार्थ्याला इयत्ता 7 वी मध्ये 55% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अशा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासन मान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थींनीस या परीक्षेस बसता येते.
What's Your Reaction?