नवचेतना अभियान अंतर्गत खडकसुकेणे येथे महिला हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

Feb 5, 2026 - 12:11
 0
नवचेतना अभियान अंतर्गत खडकसुकेणे येथे महिला हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

नवचेतना अभियान अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत खडकसुकेणे येथे एकल, विधवा तसेच गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सक्षमीकरणावर भर देण्यात आला.

जिल्हा परिषद नाशिकचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकारजी पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या नवचेतना अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमास दिंडोरी तालुक्याचे मा. श्री. भास्करजी रेंगडे (गटविकास अधिकारी) तसेच मा. श्री. भरतजी वेंदे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मा. श्री. भास्करजी रेंगडे यांनी एकल व विधवा महिलांबाबत मार्गदर्शन करताना समाजात महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच प्लास्टिक बंदी, महिला बचत गट, महिलांचे आरोग्य, शिक्षण याबाबत सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले.

मा. श्री. भरतजी वेंदे यांनी विधवा व एकल महिलांसाठी सेंद्रिय शेती, MSPRA अंतर्गत आरोग्य, शिक्षण व बचत गटांचे महत्त्व स्पष्ट करत सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, कृषी सहाय्यक, CHO, आशा व अंगणवाडी सेविका, CRP, बचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी व विविध शासकीय कर्मचारी यांनीही उपस्थिती नोंदवली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow