ऊर्जा संवर्धन सप्ताह निमित्त सिकंदरपूर येथे जागृती कार्यशाळेचे आयोजन

Dec 16, 2025 - 10:37
Dec 16, 2025 - 10:39
 0
ऊर्जा संवर्धन सप्ताह निमित्त सिकंदरपूर येथे जागृती कार्यशाळेचे आयोजन

सिकंदरपूर - ( ता.लातूर ), दि. १५ डिसेंबर २०२५ ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महावीज वितरण कंपनी (महाऊर्जा) विभागीय कार्यालय, लातूर येथील ग्रामसंसद भवन, सिकंदरपूर येथे " ऊर्जा बचत – काळाची गरज " या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी १४ ते २० डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या या सप्ताहाचा उद्देश नागरिकांमध्ये ऊर्जा बचतीची जागृती निर्माण करणे हा आहे.

या कार्यशाळेत महाऊर्जाचे महाव्यवस्थापक श्री. आनंद कुलकर्णी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिकंदरपूर येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना ऊर्जा बचतीचे महत्त्व सविस्तर समजावून सांगितले. त्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ उपस्थितांना दिली आणि " ऊर्जा बचत – काळाची गरज " हा नारा किती आवश्यक आहे हे अधोरेखित केले. या वेळी सिकंदरपूरच्या उपक्रमशील सरपंच सौ. रेशमाताई गंभीरे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात ऊर्जा बचत या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तर यशदा संस्थेचे प्रवीण प्रशिक्षक श्री. माधव गंभीरे यांनी सिकंदरपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमा विषयी सविस्तर माहिती प्रास्ताविकात दिली. ज्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी झाला.

या उपक्रमात महावितरणचे प्रकल्प अधिकारी सागर कुलकर्णी, अंजली जाधव व गृहपाल संध्या देवगावकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री. खंडू कलबूणे, महावितरणचे वसुली अधिकारी राकेश सूर्यवंशी, सुभाष मुसळे व स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. 
अशा कार्यक्रमांद्वारे ऊर्जा संवर्धनाचे ध्येय साध्य होईल आणि समाजात जनजागृती वाढेल, असे मत श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow