हिरडस मावळ : मौजे नांदगाव समतानगर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

Dec 20, 2025 - 17:17
 0
हिरडस मावळ : मौजे नांदगाव समतानगर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

हिरडस मावळ परिसरातील मौजे ग्रामपंचायत नांदगाव, तालुका भोर, जिल्हा पुणे येथील समतानगर रस्त्याचे बहुप्रतिक्षित काँक्रिटीकरणाचे विकासकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

संपूर्ण रस्ता हा मुख्य रहदारीचा असल्यामुळे त्याचे काँक्रिटीकरण होणे अत्यंत आवश्यक होते. स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी रस्ता लवकर पूर्ण व्हावा, अशी जोरदार मागणी होत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे.

रस्ता पूर्ण झाल्यामुळे दैनंदिन वाहतूक सुलभ झाली असून विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा मोठा लाभ होणार आहे. “दिलेला शब्द पूर्ण केला” याचे समाधान असून लोकसेवा म्हणजे काय, याचा एक सकारात्मक अनुभव आणि आनंद मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या विकासकामासाठी
मार्गदर्शन : मा. विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर (भोर–राजगड–मुळशी)
विशेष सहकार्य : विकासरत्न मा. रणजीतदादा शिवतरे, उपाध्यक्ष – जिल्हा परिषद

यांच्या सहकार्यामुळे हे काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊ शकले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow