ग्रामपंचायत खडक सुकेणे येथे विधवा व एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण — समाजात सन्मानाची नवी परंपरा

Jan 27, 2026 - 12:10
 0
ग्रामपंचायत खडक सुकेणे येथे विधवा व एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण — समाजात सन्मानाची नवी परंपरा

खडक सुकेणे | प्रतिनिधी
दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन व गणराज्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत खडक सुकेणे येथे एक आगळावेगळा व समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी गावातील विधवा व एकल जेष्ठ महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना सन्मान देण्याची अभिनव संकल्पना ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात उतरवली.

या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी ध्वजारोहण पुढील मान्यवर महिलांच्या हस्ते पार पडले —

  1. जिल्हा परिषद शाळा, खडक सुकेणेश्रीमती अंजनाबाई चिंधु गुंबाडे

  2. ग्रामपंचायत कार्यालयश्रीमती लताबाई देवराम आवारे

  3. पोस्ट ऑफिस, खडक सुकेणेश्रीमती भागीरथीबाई जगन गणोरे

समाजात विधवा व एकल महिलांना सन्मान, संधी व आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायत खडक सुकेणे यांच्या वतीने हा अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास सरपंच रंजनाताई गुंबाडे, उपसरपंच मधुकर फुगट, ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, शिक्षकवर्ग, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गांगुर्डे उपस्थित होते.

संपूर्ण गावाच्या साक्षीने पार पडलेला हा उपक्रम सामाजिक समतेचा व महिला सन्मानाचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow