फी माफी सवलत ( ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा पालकांच्या पाल्यांना ई. बी. सी. सवलत. )

Feb 15, 2025 - 13:27
Feb 15, 2025 - 13:31
 0
फी माफी सवलत ( ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा अधिक नाही अशा पालकांच्या पाल्यांना ई. बी. सी. सवलत. )

आर्थिक दृष्टया (मागासवर्गीय) दुर्बल घटकातील विदयार्थ्यांना फी माफीची सवलत (ई.बी.सी ही योजना) सन 1959 राज्यात इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत राबविली जात होती.मात्र शासन निर्णय/शिक्षण व सेवा योजन विभाग,क्र.एफईडी/1084/(2568)/साशि-5 फेब्रुवारी 1987 च्या निर्णयान्वये इयत्ता 12 पर्यंत मुलींना मोफत शिक्षण करणेत आले त्यानंतर शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग,क्र.एफईडी/1096/प्र.क्र./1978/96/साशि- 5 दिनांक 13 जून 1996 अन्वये इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत सर्वाना नि:शुल्क शिक्षण योजना सुरु करणेत आल्याने उपरोक्त योजनेचा लाभ सध्या इयत्ता 11 वी 12 मधील मुलांना अनुज्ञय आहे.अनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील विदयार्थ्यांना प्रवेश शुल्क व सत्र शुल्क यांची आणि विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील विदयार्थ्यांना प्रवेश शुल्क,सत्र शुल्क व शिक्षण शुल्क यांची प्रमाणीत दराने प्रतीपुरती संबधित शाळांना केलीे जाते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow