तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शन
मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेचा व नवकल्पनेचा पाठपुरावा करणेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे आपल्या सभोवताली विज्ञान असलेल्याची त्याच बरोबर आपण भौतिक व सामाजिक पर्यावरणाच्या शिकाऊ प्रक्रियेच्या संबधांनी अनेक समम्या सोडवू शकतो.याची मुलांना जाणीव करुन देणे,आत्मनिर्भरता, सामाजिक व आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती साध्य करणेकरिता मुख्य साधन म्हणून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देणे,समाजाच्या उपयोगासाठी गुणवत्तापूर्ण व पर्यावरणांस अनुकूल वस्तूंच्या उत्पदनासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे, मुलांना राष्ट्राच्या भवितव्यासाठी दूरद्ष्टी ठेवण्यास प्रोत्साहन देऊन त्यांना जबाबदार व संवेदनशिल नागरिक बनविण्यास मदत करणे.विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती कशी झाली, त्याचा परिणाम व्यक्ती,संस्कृती व समाज यांच्यावर कसा पडला याचे विश्लेषण करणे.सुदृढ व वैश्विक मुद्यांनुसार चिरस्थायी समाज टिकवून ठेवण्यासाठी तर्कसंगत व विवेचनात्मक विचारसरणी विकसित करणे.दैनंदिन जीवनात समस्यांचे निरिक्षण व निदान करण्यासाठी गणितीय शास्त्राचा उपयोग करणे. हवामानातील बदल यांसारख्या समस्यांना सामना करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे स्वागत करणे,कृषि,रासायनिक खते,अन्न प्रक्रिया,जैवतंत्रज्ञान,हरित ऊर्जा,माहिती व दळवळण आणि तंत्रज्ञान,खगोल विज्ञान,परिवहन,क्रिडा व खेळ इत्यादी क्षेत्रात नवीन उपाय शोधणे.विदयार्थी आणि शिक्षक यांनी विज्ञान व तंत्रज्ञानामधील नवनवीन शोध व विकास कुठे व कसा ओळखायचा या दृष्टीने मानवी प्रयत्नांच्या सर्व बाजूंवर विश्लेषणात्मक प्रयत्न करणे.
What's Your Reaction?