पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट

Mar 20, 2025 - 12:37
 0
पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची विधानभवनाला भेट

मुंबई, दि. १९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत पुणे विभागातील  आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांनी राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळाली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा चालवल्या जातात. याच उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 56 मुली आणि 44 मुलांनी विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी शासनाच्या प्रयत्नांविषयी माहिती देताना सांगितले की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची व कुटुंबाची प्रगती साधत राष्ट्राच्या भल्यासाठी सकारात्मक योगदान देणारे सक्षम नागरिक बनावेत, हा शासनाचा प्रयत्न आहे.

या भेटीआधी विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट दिली.

ही भेट विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली, असे उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow